राज्यासह नगर शहरामध्ये शिवजंयती उत्साहात साजरी

विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी ; ‘जिल्हा मराठा’ ची लक्ष्यवेधी मिरवणूक
 

नगर (दि.19) : छत्रपती शिवाजी महाराज यांची 390 वी जयंती बुधवारी (दि.19) नगर शहरात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. चौकाचौकात शिवप्रतिमा, शिवपुतळ्यांची स्थापना करून पोवाडे लावण्यात आले होते. तसेच विविध ठिकाणी भगव्या कमानी उभारण्यात आल्या होत्या तर भगव्या झेंड्यांनी वातावरण शिवमय झाले होते. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विविध शाळांमधील सुमारे 5 हजार विद्यार्थ्यांनी शहरातून पारंपरिक पद्धतीने काढलेली भव्य मिरवणूक लक्षवेधी ठरली. शिवराय मनामनात शिवराय घराघरात यानुसार संपुर्ण शहरात रांगोळी व भगव्या झेंड्यानी शहर सजले होते. अनेकांनी आज घरावर भगवा ध्वज लावून शिवरायांना अभिवादन केले.

शहरातील जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास सकाळी अभिषेक करण्यात आला. सकाळी 8.30 वाजता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रभारी पोलिस अधिक्षक सागर पाटील, आ. संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, प्राचार्य डॉ. बी.एच.झावरे यांच्यासह अनेकांनी पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या, मावळ्यांच्या वेशभूषा केलेल्या होत्या. लेझीम पथक, झांजपथक लक्ष वेधून घेत होते.
दरम्यान या मिरवणूकीत जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, अतिरिक्त पोलिस अधिक्षक सागर पाटील, आमदार संग्राम जगताप, डिवायएसपी संदीप मिटके, जिल्हा मराठाचे नंदकुमार झावरे, जी.डी.खानदेश, अ‍ॅड.विश्‍वास आठरे, रामचंद्र दरे, प्रा.बी.एच.झावरे, शिवाजी साबळे, सुधाकर सुंबे, आ.संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, सुभाष कराळे, बाळासाहेब खुळे, सचिन कोतकर, सुनिल जाधव,,सतीष दारकुंडे, राजेंद्र निंबाळकर, अमोल लहारे, किशोर मरकड, संजीव भोर, प्रकाश कराळे, डॉ.ज्ञानेश्‍वर गांगर्डे, सोपानराव मुळे, अ‍ॅड.शिवाजी कराळे, राजेंद्र म्हस्के, अशोक वारकड, विठ्ठलराव गुंजाळ, उबेद शेख, अमिर सय्यद,  बबनराव सुपेकर, यशस्वीनी ब्रिगेडच्या रेखा जरे, छावा संघटनेच्या सुरेखा सांगळे, बबनराव सुपेकर, यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी या मिरवणूकी सहभागी झाले होते. 

Post a Comment

Previous Post Next Post