माजी नगरसेवक कैलास गिरवले मृत्यू प्रकरण
नगर एलसीबीच्या 16 कर्मचार्यांना हायकोर्टाच्या नोटिसा
मृत्यू प्रकरणाच्या तपासाबाबत अहवाल सादर करण्याचे सीआयडीला निर्देश
नगर (दि.21) : दिवंगत माजी नगरसेवक कैलास गिरवले यांचा पोलिस कोठडीतील संशयास्पद मृत्यूप्रकरणी सखाले तपास व्हावा व संबंधित दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी त्यांच्य पत्नी निर्मला कैलास गिरवले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात दाखल केलेल्या क्रिमीनल रिट पिटीशन नं.1195/2018 ची सुनावणी दि.20 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी न्यायमुर्ती टी.व्ही.नलावडे व न्यायमूर्ती एम.जी.शेवाळकर यांच्या खंडपीठासमोर होऊन न्यायालयाने संबंधित प्रकरणातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नगरचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह 16 पोलिस कर्मचार्यांना आपले म्हणणे सादर करण्यासंदर्भात नोटीस जारी केल्या आहेत.
तसेच संबधित प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) आजपर्यंत काय तपास केला, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी दि.27 मार्च 2020 रोजी होणार आहे. पुढील सुनावणी तारखेपर्यंत सीआयडीने आपला अहवाल सादर करावयाचा आहे. रिट पिटीशनर निर्मला कैलास गिरवले यांच्यातर्फे अॅड.नितीन गवारे पाटील यांनी बाजू मांडली आहे. शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणानंतर सायंकाळच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन चौकशीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी नेले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, मनपातील नगरसेवक हे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात गेलेले होते. तेथे सयंकाळी पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये चकमक उडून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या दरवाजचे व इतर नुकसान झाले होते. या प्ररणामध्ये पोलिसांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ल्यासंदर्भात भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविला होता. या गुन्हयात माजी नगरसेवक कैलास गिरवले यांना आरोपी करण्यात आलेले होते.
कैलास गिरवले यांना पोलिसांनी नंतर त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले होते. अटकेत असताना कैलस गिरवले यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांनी मारहाण केली. मारहाण केल्यानंतर त्यांची तब्येत खालावली व त्यांना नंतर जिल्हा रुगणालयात दाखल करण्यात आले होते. गिरवले यांची तब्येत आणखी खालाावल्यानंतर त्यांना उपचारार्थ पुणे येथील रुग्नालयात नेण्यात आले होते. पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. यानंतर पोलिसांच्या मारहाणीतच कैलास गिरवले यांचा मृत्यू झाल अशा आशयाची तक्रार त्यांच्या पत्नी निर्मला गिरवले यांनी आपल्या याचिकतेत केलेली असून त्यासंदर्भात संबंधितांवर कारवाईची मागणी केलेली आहे.
दि.20 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने संबंधित प्रकरणात वरील आदेश केले आहेत. एलसीबीचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार तसेच पोलिस कर्मचारी रवी कर्डिले, सय्यद मन्सूर पाशामियाँ, भाऊसाहेब काळे, श्रीधर गुट्टे, दत्तात्रय गव्हाणे, विजयकुमार वेठेकर, विजय ठोंबरे, मनोज गोसावी, योगेश गोसावी, संदीप घोडके, किरण जाधव, दत्ता हेगडे, आदीसंह एकूण 16 जणांना आपले म्हणणे मांडण्यासाठी न्यायलयाने नोटिसा बजावल्या आहेत.
Tags:
Maharashtra
