मारुतीराव थोरात यांचे निधन
नगर (दि.18) : शहरातील समतानगर येथील रहिवासी मारुतीराव बाबुराव थोरात यांचे दि.21 फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षाचे होते. त्यांचे मुळगाव खर्डा (ता. जामखेड) हे होते. ते वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी तथा पत्रकार सुशील थोरात, सुनील थोरात आणि अनिल थोरात यांचे वडील होत.
त्यांच्यामागे तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. यांचा अंत्यविधी शोकाकुल वातावरणात नालेगाव (नगर) अमरधाम मध्ये झाला. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags:
Ahmednagar
