वाशिमच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद



वाशिमच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वाशीम (दि.23) : मराठा सेवा संघ प्रणित डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने वाशीम येथील वाटाणे लॉन्स मंगल कार्यालयात शनिवारी 22 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत आयोजित आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून दीड हजारांपेक्षा अधिक शिक्षकांनी संपूर्ण राज्यभरातून या परिषदेला आपली हजेरी लावली आहे.

या शिक्षण परिषदेला उद्घाटक म्हणून वाशिमच्या खासदार भावनाताई गवळी तर उद्घाटन सत्राचे अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे राज्य कार्याध्यक्ष प्राचार्य अर्जुनराव तनपुरे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्ह्याचे पालक सचिव तथा राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार साहेब उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमितभाऊ झनक, जिल्हा परिषद शिक्षण सभापती चक्रधर गोटे, अमरावती विभागीय शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. किरणराव सरनाईक, अर्थ व बांधकाम सभापती विजय खानझोडे, श्री साई शिक्षण संस्थेचे प्रमुख सुनील पाटील, शांताबाई गोटे महाविद्यालयाचे संचालक डॉ.नारायणराव गोटे, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजीनियर प्रशांत बोरसे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.

दुसऱ्या सत्रात आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार माहिती व दिशा या विषयावर शिक्षक केंद्रप्रमुख व विद्यार्थी यांची मुलाखत तसेच इतर भूमिका यावर चर्चासत्र संपन्न झाले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात आंतरराष्ट्रीय शाळा वाबळेवाडी जिल्हा पुणे येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीशअण्णा वाबळे, मुख्याध्यापक दत्तात्रय वारे व पालक सचिव नंदकुमार साहेबांची मुलाखत प्रश्नोत्तरे हा प्रबोधनात्मक दिशादर्शक कार्यक्रम पार पडला.

समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राज्य महासचिव माननीय मधुकराव साहेब तर प्रमुख अतिथी म्हणून मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष तथा केंद्रप्रमुख संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अशोकराव महाले, प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे, मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष वसंतराव अवचार व प्राध्यापक भरत आव्हाळे, संस्थाचालक अनिलभाऊ गवळी सर्व गटशिक्षणाधिकारी आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. 

दिवसभराच्या कार्यक्रमात कोकलगांव शाळेच्या शिक्षिका मीनाक्षीताई नागराळे यांच्या स्वराज्याचे मावळे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. तसेच गुणवत्तेसाठी वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व पुरोगामित्वामधून शिक्षणासाठी काम करणाऱ्या संजय कापसे, गोपाल खाडे, रुपये धोटे, यादवराव सरकटे, मीनाक्षीताई नागराळे, उषाताई हाडे, महादेवराव बोरकर आदी शिक्षकांचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोकराव महाले यांनी, संचालन नारायणगाव काळबांडे व सविताताई बोरकर यांनी तर आभारप्रदर्शन केशवराव वाबळे यांनी अत्यंत सुरेखपणे पार पाडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष कैलासराव सोळंके व त्यांचे सहकारी संजीव कोरडे, कैलासराव भांदुर्गे, मिलिंद भगत, साबळे, गजानन गावंडे, संदीप ढोरे, उत्तमराव आहेर, विलास सोनटक्के, निंबाजी काळबांडे, रुपेश धोटे, संजय कापसे, भारत सोनटक्के,ज्योत्सनाताई ठाकरे, लताबाई गायकवाड, वर्षाताई गावंडे, मिनाक्षी नागराळे, उज्ज्वला सोनवणे, जयश्री शिंदे, सविताताई बोरकर, दीपालीताई मापारी, भारत सोनटक्के, गजानन बुरकुले, कुणाल व्यास, पांडुरंग खोडे, माधव वानखेडे,संजीव राऊत, मंगेश भोरे तसेच गजानन भोयर, डॉ. प्रशांत गावंडे आदींनी प्रयत्न केले.

Post a Comment

Previous Post Next Post