गाडे शिक्षण संस्थेत पारितोषिक वितरण
चिचोंडी पाटील (दि.23) : स्पर्धेचे युग असले तरी फक्त स्पर्धेत सहभाग न नोंदवता त्यात चमकण्याची जिद्द अंगी बाळगायला हवी. जो प्रयत्न करतो त्यालाच यश मिळते,असे प्रतिपादन जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कार्यकारी मंडळाचे सदस्य जयंत वाघ यांनी केले.
फकिरवाडा येथील यशवंतराव गाडे शिक्षण संस्थेतील यशवंत माध्यमिक विद्यालय व श्री गणेश बालक मंदिरचे वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून वाघ बोलत होते. या वेळी शहर वकील संघटनेचे अध्यक्ष भूषण बऱ्हाटे, संस्थेचे खजिनदार संजय गाडे, नगरसेवक योगिराज गाडे, नगरसेविका ज्योती गाडे संस्थेचे उपाध्यक्ष एम. पी. कचरे, संचालक रामचंद्र दिघे, आसाराम म्हस्के, शिक्षक -पालक संघाचे प्रतिनिधी नादीर खान आदी उपस्थित होते. या वेळी विद्यालयातील विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
या वेळी बऱ्हाटे यांनी विद्यालयात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक करून विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अरिबा शेख व आवेज सय्यद यांची निवड करण्यात आली. या वेळी स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
स्वागत मुख्या. अजंली निक्रड यांनी केले. प्रास्ताविक मुख्या. हेमलता बनकर यांनी केले. सूत्रसंचालन योगेश गुंड यांनी केले. मनीषा गोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
Tags:
Ahmednagar
