सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत : अ‍ॅड. लगड

 
 
सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

नगर (दि.21) : लष्कर कमांडर या पदावर पुरुषांप्रमाणे महिलांनाही संधी देण्याचा निर्णय सुपिम कोर्टाने नुकताच दिला आहे त्याचे राष्ट्रवादी महिला काँग्रेच्यावतीने स्वागत करण्यात आले

याबाबत अ‍ॅड.सौ.शारदाताई लगड यांनी सांगितले की, शारीरिक क्षमता व मनाचा खंबीरपणा याबबत महिला पुरुषांच्या तुलनेत दुबळ्या असतात ही पुर्वापार धारणा अधिकृत धोरण म्हणून सरकारने अंगीकारावी हे खेदजनक आहे असे ताशेरे केंद्र सरकाराविरुध्द सुप्रिम कोर्टाने नुकतेच ओढले आहेत. महिला कोणत्याही बाबतीत पुरुषांहून कमी नाहीत. लष्करात महिलांची भरती सुरु झाल्यापासून त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी समर्थपणे पेलून महिलांनी आपली योग्यता सिध्द केली आहे. त्यामुळे पर्मनंट कमिशन व कमांड पोषटींगच्या बाबतीत त्यांना कमी लेखून त्यांच्या करीअरच्या प्रगतीत काल्पनिक अडथळे निर्माण करणे ही राज्यघटनेतील समानतेच्या तत्त्वाची उघड उघड पायमल्ली असल्याचे सुप्रिम कोर्टाने म्हंटले आहे.

महिला कमांडरने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात सैनिकांची कुचंबना होईल असे हस्यास्पद समर्थन केंद्र सारकारने केलेले होते.  कुठलाही लिंगभेद न करता महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने संधी देण्याचा निर्णय स्तुत्य आहे. सुप्रिम कोर्टाच्या या ऐतिहासिक निर्णयाचे केंद्र सरकारला चपकार बसून या पूर्वापार नियमात सुधारणा होणार असल्याचे लगड यांनी म्हंटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post