माळीवाड्यात टोळक्याकडून लाकडी दांडक्यांनी टपरीची तोडफोड!

माळीवाड्यात टोळक्याकडून लाकडी दांडक्यांनी टपरीची तोडफोड

। अहिल्यानगर । दि.18 फेब्रुवारी 2026 । शहरातील महात्मा फुले चौक, मार्केट यार्ड परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या तीव्र वादातून तुंबळ हाणामारीची घटना घडली. या घटनेत सार्वजनिक शांततेचा भंग झाला असून एका बर्फाच्या टपरीची लाकडी दांडक्यांनी तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाणे येथे सहा जणांसह 10 ते 15 अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शोध पथकाचे पोलीस कर्मचारी अतुल केशव काजळे आणि होमगार्ड मुर्तजा सय्यद हे रात्री पेट्रोलिंग करत असताना मार्केट यार्ड परिसरात दोन गटांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता सुमारे 10 ते 15 जण एकमेकांना शिवीगाळ करत आरडाओरड करत असल्याचे निदर्शनास आले.

यावेळी संतप्त झालेल्या आरोपींनी रस्त्याकडेला उभी असलेल्या एका बर्फाच्या टपरीवर लाकडी दांडक्यांनी हल्ला चढवून तिचे मोठे नुकसान केले. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र संबंधित व्यक्तींनी वाद सुरूच ठेवला. या प्रकरणी पोलिसांनी काहींना  ताब्यात घेतले आहे. तसेच इतर 8 ते 10 अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post