गॅसची अवैध रिफिलिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

गॅसची अवैध रिफिलिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; कोतवाली पोलिसांची धाडसी कारवाई

।  अहिल्यानगर । 17 फेब्रुवारी 2026 ।  नगर शहरात अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणार्‍या आरोपीकडून 1 लाख 17 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत त्यास जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखेने बेट पटांगणात ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार सुनील पवार, शाहीद शेख, गणेश धोत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना जुन्या महापालिकेजवळील बेग पटांगणात शेडच्या आडोशाला गॅस घरगुती गॅस टाक्यामधून वाहनामध्ये रिफिलिंग करित असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता, एकजण गॅस टाक्यामधून चारचाकी वाहनामध्ये गॅस रिफिलिंग करताना दिसून आला. 

त्याने त्याचे नाव अरविंद वसंत वाघमारे (वय 25,रा. संजयनगर, काटवन खंडोबा) असे असल्याचे सांगितले आहे.1 लाखाचे चारचाकी वाहन, 5 हजाराची एक मोटार कॉम्प्रेसर व दोन रबरी पाईप, 7 हजार 500 रूपये किंमतीच्या 3 गॅस टाक्या, 5 हजाराचा एक इलेक्ट्रीक वजन काटा, असा एकुण 1 लाख 17 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post