आरोग्यदायी व थॅलेसेमियामुक्त पिढी घडविण्यासाठी समाजात जनजागृती होणे आवश्यक : अभय मेस्त्री

थॅलेसेमिया मुक्त अहिल्यानगर जिल्हा अभियान अंतर्गत निःशुल्क तपासणी शिबिर जनकल्याण रक्तकेंद्राचा पुढाकार

आरोग्यदायी व थॅलेसेमियामुक्त पिढी घडविण्यासाठी समाजात जनजागृती होणे आवश्यक- अभय मेस्त्री



। अहिल्यानगर । दि.06 जुलै 2026 । थॅलेसेमिया हा अनुवंशिक रक्ताचा आजार आहे.आई-वडिलांकडून मुलांमध्ये होऊ शकतो. आयुष्यभर रक्त वाढवावे लागू शकते. योग्य काळजी घेतल्यास हा आजार टाळता येऊ शकतो.

थॅलेसेमिया हा आजार गंभीर चिंताजनक बाब आहे.थॅलेसेमिया या गंभीर आनुवंशिक आजारा विषयी समाजात जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. लग्नापूर्वी प्रत्येक जोडप्याने थॅलेसेमिया वाहक (मायनर)ची रक्त तपासणी करणे अनिवार्य आहे. 

दोन थॅलेसेमिया (मायनर) वाहकांचे लग्न टाळून होणाऱ्या मुलांमधील थॅलेसेमिया मेजर चा धोका रोखण्यास मदत होईल. जनकल्याण रक्तकेंद्राच्या वतीने अहिल्यानगर मुक्त थॅलेसेमिया करण्यासाठी उचललेले हे पहिले पाऊल आहे. आरोग्यदायी व थॅलेसेमिया मुक्त पिढी घडविण्यासाठी समाजात जनजागृती होणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन जनकल्याण रक्त केंद्राचे अध्यक्ष अभय मेस्त्री यांनी केले आहे.


नालेगाव येथील जनकल्याण रक्त केंद्रात  थेलेसेमिया मुक्ता अहिल्यानगर जिल्हा अभियान अंतर्गत निशुल्क थेलेसेमिया तपासणी, सीबीसी टेस्ट, आणि समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी अहिल्यानगर जिल्ह्यातून थेलेसेमीया रुग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच सामाजिक कार्यकर्ते व तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रमुख उपस्थितीत जनकल्याण रक्तकेंद्राचे अध्यक्ष अभय मेस्त्री,कार्यवाह सतीश इंदानी,आदित्य चांदेकर, संचालिका.सौ.रुपाली म्हसे,डॉ.अंजली केवळ, डॉ.अमेय कांबळे,जिल्हा रुग्णालय थॅलेसेमिया डे केअर सेंटरच्या डॉ.रुपाली कुलकर्णी,डॉ.गुलशन गुप्ता,डॉ.गौरी जोशी, प्रशासकीय अधिकारी सागर उंडे,सहाय्यक प्रशासकीय अधिकारी सौ.स्मिता बडवे थॅलेसेमिया जिल्हा समन्वयक गौरव पठाडे, जनसंपर्क अधिकारी डॉ.विलास मढीकर,सौ.सोनाली खांडरे,शरद बळे,शंकर खंडागळे,सौ.विनिता धामणगावकर,किरण शिंदे,गौरव बागल आदींसह जनकल्याण रक्तकेंद्राचे सर्व कर्मचारी वृंद,थॅलेसेमिया रुग्णांचे नातेवाईक व नागरिक यावेळी उपस्थित होते.


डॉ.रूपाली म्हसे म्हणाले,थॅलेसेमिया  आजारावर उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक प्रभावी असून विवाहपूर्व व गर्भधारणेपूर्वी तपासणी द्वारे भविष्यातील पिढीला थॅलेसेमिया पासून सुरक्षित ठेवता येऊ शकते. थॅलेसेमिया या अनुवंशिक आजाराच्या प्रतिबंधासाठी समाजात व्यापक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने थॅलेसेमिया मुक्त अहिल्यानगर जिल्हा अभियान हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.


डॉ.अंजली केवळ म्हणाले, थॅलेसेमिया तपासणी कोणी करावी-लग्न ठरलेल्या युवक युवती, महाविद्यालयीन विद्यार्थी,नवविवाहित जोडपी, थॅलेसेमिया  रुग्णांच्या नातेवाईकांनी तसेच ज्या कुटुंबाचा इतिहास आहे.त्यांनी ही तपासणी करणे आवश्यक आहे.


आदित्य चांदेकर म्हणाले, थॅलेसेमिय प्रतिबंधक उपाय म्हणून प्रत्येक जोडप्याने विवाहपूर्व थॅलेसेमिया तपासणी करणे आवश्यक आहे. थॅलेसेमिया मुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सकारात्मक भूमिका घेणे महत्त्वाची आहे. अहिल्यानगर मुक्त थॅलेसेमिया करण्यासाठी जनकल्याण रक्तकेंद्राने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. थॅलेसेमिया या आजाराविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जनकल्याण रक्तकेंद्राशी नागरिकांनी संपर्क साधावा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.


यावेळी उपस्थित नागरिकांना "थॅलेसेमिया मुक्त अहिल्यानगर"करण्यासाठी सोनाली खांडरे यांनी प्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विलास मढीकर यांनी केले. तर आभार थॅलेसेमिया समन्वयक गौरव पठाडे यांनी मानले.



Post a Comment

Previous Post Next Post