​बुरुड गल्लीतील तीन मजली इमारतीला भीषण आग...

बुरुड गल्लीतील तीन मजली इमारतीला पहाटे भीषण आग

20 हून अधिक बंबांनी आग आनली अटोक्यात

‘एएस मार्केटिंग’चे गोदाम जळून खाक




। अहिल्यानगर । दि.02 डिसेंबर 2025 । अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती भागामधील बुरुड गल्ली भागात मंगळवारी पहाटेच्या 6.30 ते 7.00 वाजण्याच्या सुमारास एका तीन मजली जुन्या इमारतीला भीषण आग लागली.

या इमारतीमध्ये असलेल्या ’ए एस मार्केटिंग’चे मोठे गोदाम या आगीत जळून खाक झाले असल्याची माहिती समोर येत आहे. सकाळच्या वेळी फेरफटका मारणार्‍या (सकाळचा व्यायाम करणार्‍या) लोकांना दुकानातून धूर येत असल्याचे दिसल्याने एकच खळबळ उडाली.

सदर परिसरात लाकडी वस्तू व बांबूचा व्यवसाय असल्याने, तसेच गोदामात कॅडबरीसह किरकोळ मालाचा साठा असल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले असल्याचे अनेकांनी यावेळी सांगितले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post