प्रा.डॉ.म्हातारदेव म्हस्के यांना 'आदर्श जिजाऊ माँसाहेब पुरस्कार' जाहीर


। आष्टी । अहिल्यानगर । दि.02 डिसेंबर 2025 । मराठा सेवा संघ प्रणीत तानुबाई बिरजे पत्रकार परिषद,आष्टी यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना 'जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार' प्रदान केला जातो. यावर्षीचा हा मानाचा पुरस्कार प्रा.डॉ. म्हातारदेव म्हस्के  ( अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित रेसिडेन्शिअल ज्युनिअर कॉलेज, अहिल्यानगर ) यांना जाहीर झाला असल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार ऍड. सीताराम पोकळे यांनी दिली.

शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. डॉ.म्हस्के यांच्या निवडीबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रा.ह.दरे साहेब, सचिव ऍड. विश्वासराव आठरे पाटील,सहसचिव मुकेश दादा मुळे, खजिनदार ऍड. दीपलक्ष्मी म्हसे मॅडम, प्राचार्य विजयकुमार पोकळे सर, उप प्राचार्य दादासाहेब वांढेकर, उपमुख्याध्यापिका दरे मॅडम, पर्यवेक्षिका दारकुंडे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक कांजवणे सर, तसेच आष्टी पंचायत समिती माजी सभापती ऍड. साहेबराव म्हस्के दैनिक झुंजार नेता चे ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे, गर्भागिरी भूषण चे पत्रकार आजिनाथ ठोंबरे, दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार डॉ.सूर्यकांत वारकड ,मच्छिंद्रनाथ देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे सर, 

सचिव बाबासाहेब म्हस्के, सरपंच अर्जुन भाऊ म्हस्के, पीएसआय सोमनाथ म्हस्के,ज्ञानेश्वर गायखे, बद्रीनाथ म्हस्के, तुकाराम म्हस्के, संदीप म्हस्के, अशोक शेठ म्हस्के,डॉ.वसंत म्हस्के, सुभाष म्हस्के सर, बाळासाहेब म्हस्के, दत्तात्रय म्हस्के, संभाजी म्हस्के मेजर, बाळासाहेब गुगळे, विजय दानवे, संदीप वाघमारे सर, शैलेश खणकर सर,आणि महाविद्यालयातील सर्व सहकारी शिक्षक  बंधू-भगिनी  या सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. डॉ. म्हातारदेव म्हस्के यांना मागील काही वर्षांत त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच त्यांच्या या यशाबद्दल अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post