संगनेरमध्ये दारू वाहतूक करणार्‍या चौघांवर कारवाई

संगनेरमध्ये दारू वाहतूक करणार्‍या चौघांवर कारवाई

एलसीबीकडून पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त


। अहिल्यानगर । दि.02 डिसेंबर 2025 । नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर शहरामध्ये दारुची वाहतूक करणा-या चारजणांवर कारवाई केली. यात 1 लाख 89 हजार 620 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

एलसीबीच्या पथकाने दिनांक 30 रोजी संगमनेर शहर परिसरात या कारवाया करून भाऊसाहेब सखाराम दळवी (वय- 40 वर्षे रा. चिकणी ता.संगमनेर), नवनाथ भारत घोडेकर (वय- 30 वर्षे रा. घोडेकर मळा संगमनेर), किरण गोरख घोडेकर (वय- 30 वर्षे रा. घोडेकर मळा) तसेच वेदांत वाईन शॉपीचे चालक-मालक अशा चौघांवर कारवाई करून एकूण 1 लाख 89 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, अमृत आढाव, योगेश कर्डिले व महादेव भांड यांनी ही कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post