| अहिल्यानगर | संगमनेर | दि.१४ नोव्हेंबर २०२५ | भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिद्ध झाले आहे. व्होटचोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली. अतिशय खालच्या स्तरावर जावून कॉग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला. प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.
निवडणुकी पूर्वी व्होटचोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली. संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले. आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले. विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.
बिहारच्या निवडणुकीत कॉग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता परदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.
💊 पिल्लांच्या मायेने बिबट्या पिंजर्यात अडकला!
💊 जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी
💊 अहिल्यानगर - मनमाड मार्गावरील अवजड वाहतूक...
