पिल्लांच्या मायेने बिबट्या पिंजर्यात अडकला
निघोज परिसरात तीन पिलांसह बिबट्या जेरबंद
| अहिल्यानगर | निघोज | दि.१४ नोव्हेंबर २०२५ | शिरूर, पारनेर, जुन्नर आणि आंबेगाव तालुयात बिबट्यांच्या हालचाली व हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना, पारनेर तालुयातील निघोज परिसरात मोठा दिलासा देणारी घटना घडली.
बिबट्या मादीसह तिची तीन पिले जेरबंद झाली आहेत. पारनेर तालुयातील निघोज परिसरातील मोरवाडी येथील रसाळ यांच्या उसाच्या शेतीत गुरुवारी (दि.१३) सकाळी अकराच्या दरम्यान बिबट्याची तीन पिल्ले आढळल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र तातडीने परिसरातील ग्रामस्थांनी लगेच पारनेर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी धाडे तसेच वन अधिकारी अंकराज जाधव यांना संपर्क केला. जाधव हे सहकार्यांसमवेत या ठिकाणी आले त्यांनी लगेच पिल्लांचा ताबा घेऊन. एका पिंजर्यात पिल्ले ठेवली.
रात्री आठच्या दरम्यान या पिल्लांची आई बिबट्या मादी मात्र बरोबर पिंजर्याजवळ आली आणी अडकली. बिबट्या मादी पिंजर्यात अडकल्याची बातमी सगळीकडे समजताच सर्वांना हायसे वाटले. पाच दिवसांपूर्वी गाडीलगाव, बोदगेवाडी लंके वस्ती नजीक एक बिबट्या मादी अशाच अवस्थेत फिरत होती.
त्यानंतर वनअधिकारी अंकराज जाधव व त्यांच्या सहकार्यांनी या भागात सगळीकडे पाहणी करीत लोकांना धीर देत सगळ्यांना सावध केले. तसेच पत्रकार संघ विभागीय कार्यालय निघोज या ठिकाणी भेट देऊन वनअधिकारी अंकराज जाधव, भालेकर व त्यांच्या सहकार्यांनी बिबट्या व त्यांचा बंदोबस्त या विषयी सविस्तर माहिती देऊन लवकर या भागात दहा पेक्षा जास्त पिंजरे देणार असल्याची माहिती दिली.
