निवृत्तीवेतन धारकांसाठी पेन्शन अदालत ....

निवृत्तीवेतन धारकांसाठी २१ नोव्हेंबर रोजी पेन्शन अदालत

 

| अहिल्यानगर | दि.१5 नोव्हेंबर २०२५ | जिल्ह्यातील निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा कोषागार कार्यालय येथे पेन्शन अदालत व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

निवृत्तीवेतनधारकांनी तसेच संघटनेच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी जनार्दन सहारे यांनी केले आहे.

चर्चासत्रात निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन व इतर अनुषंगिक लाभांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याबरोबरच निवृत्तीवेतन धारकांच्या विविध अडचणींचे निराकरणही करण्यात येईल, अशी माहिती श्री.सहारे यांनी दिली.

👉 नरभक्षक बिबट्याचा निंबळक मधील मुलावर हल्ला!

👉 व्होटचोरीचे आरोप करणार्‍यांना बिहारमध्ये धोबीपछाड : पालकमंत्री  

👉 पिल्लांच्या मायेने बिबट्या पिंजर्‍यात अडकला!


Post a Comment

Previous Post Next Post