। अहिल्यानगर । दि.06 मार्च 2026 । नगरमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक श्रीपाद छिंदम यास 12 तासांसाठी हद्दपार करण्याची नोटीस बजावली आहे. ही कारवाई तोफखाना पोलिसांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी श्रीपाद छिंदम वादग्रस्त ठरला आहे. छिंदम याने दिल्लीगेट येथे शिवजयंती उत्साहाचे आयोजन केले आहे. त्यास शिवप्रेमींनी विरोध केला. या पार्श्वभूमीवर तोफखाना पोलिसांनी छिंदम यास 12 तासांसाठी हद्दपारीची नोटीस बजावली आहे. तसेच पोलिसांनी आज सकाळी दिल्लीगेट येथील फलक देखील काढले.
Tags:
Ahmednagar

