राज्यसभेसाठी भाजपाकडून नांव जाहीर! महाराष्ट्रामधून कोण...?

। मुंबई । दि.04 मार्च । भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी चार उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप सरचिटणीस विनोद तावडे, माया चिंतामण इवनाते आणि रामराव वडकुटे यांचा समावेश आहे. 


राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजेच सात जागा रिक्त होणार आहेत.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर होणे, हे त्यांच्या संघटनात्मक कौशल्याचे आणि पक्षनिष्ठेचे फळ मानले जात आहे..

Post a Comment

Previous Post Next Post