| अहिल्यानगर | दि.१४ नोव्हेंबर २०२५ | दोन दिवसांपूर्वी खारे कर्जुने येथे पाच वर्षाच्या मुलीला कालच बिबट्याने ठार केले होते.आज शुक्रवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास निंबळक येथील कोतकर वस्ती वरील राजवीर रामकिसन कोतकर या आठ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. पण या हल्ल्यातून मुलगा बालबाल बचावला पण गंभीर जखमी झाला आहे.
मुलगा बालबाल बचावला पण गंभीर रित्या जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी अहिल्यानगर मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने कोतकर वस्ती, निंबळक गाव आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अहिल्या नगर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढत आहे. तालुक्यातील बहुतांश सर्वच गावात बिबट्याचे दर्शन घडत आहे. अनेक ठिकाणी आजवर बिबट्याने कुत्रे ,बकऱ्या , गाई यांच्यावर हल्ले केले आहेत.पण आता बिबटे मानवी वस्तीत.घुसून माणसांवर हल्ले करत आहेत
ऊसतोड सुरू असताना शेतकरी आणि मजुरांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. अनेकदा मुलांना ऊसतोड सुरू असलेल्या भागातच खेळायला सोडले जाते. अशा वेळी मुलांना ठेवलेल्या ठिकाणी हातात घुंगराची काठी घेऊन एखाद्या मोठ्या व्यक्तीस थांबवावे, जेणेकरून बिबट्या दिसल्यास मुलांची सुरक्षा करता येईल. फार वाकून ऊसतोड करू नये; कारण अशा वेळी दुसरा एखादा प्राणी आहे असे समजून बिबट्याचा पाठमोरा हल्ला होऊ शकतो.
