मनपाच्या प्रारूप प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात!

 

| अहिल्यानगर | 06 ऑगस्ट 2025 | आगामी मनपा निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचे काम पूर्ण झाले आहे. जिल्हाधिकार्‍यांकडे लवकरच प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडला सादर केला जाणार आहे. सन 2011 च्या लोकसंख्येनुसार प्रभागाची सुमारे 20 हजार सरासरी लोकसंख्या निश्‍चित करून प्रभाग करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या मतदारयादीनुसार 50 हजार मतदार वाढण्याची शक्यता आहे. 

जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा ...

मागील निवडणुकीत 2 लाख 56 हजार 719 मतदार व 337 मतदान केंद्र होते. यंदा मतदान केंद्रांची संख्या वाढून 400 वर पोहोचणार आहे. प्रारूप प्रभाग रचना आराखडा जिल्हाधिकार्‍यांकडे सादर होईल. जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्य शासनाकडे व तेथून राज्य निवडणूक आयोगाकडे सादर होईल. निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर 3 सप्टेंबरला प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द केली जाणार आहे.

काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र : मुख्यमंत्री


Post a Comment

Previous Post Next Post