| नागपूर 02 | ऑगस्ट 2025 |काँग्रेसने व्होट बँक डोळ्यापुढे ठेवून भगव्या दहशतवादाचे षडयंत्र रचले. तसेच या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू संघटनांना यात नाहक गोवण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपुरात केले.
👉 कर्नाटक शासनाने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये : मुख्यमंत्री
यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, मालेगावात २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर रचलेले षडयंत्र न्यायालयाच्या निकालानंतर सर्वांसमोर उघडे पडले आहे. तत्कालिन काँग्रेस सरकारने मतांच्या राजकारणासाठी भगवा दहशतवाद हा शब्द तयार केला होता.
Tags:
Maharashtra