हॉटेलच्या रुममधून ऑनलाईन सट्टेबाजी ; गुन्हा दाखल

| अहिल्यानगर | दि.०६ ऑगस्ट २०२५ | शहरातील तारकपूर परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये बनावट आधारकार्डच्या सहाय्यने रुम घेवून त्या रुममध्ये क्रिकेट सामन्यावर आणि शेअर मार्केटवर ऑनलाईन सट्टा खेळणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकने रंगेहात पकडले आहे.

सदरची कारवाई ४ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास करण्यत आली. या कारवाईत बनावट आधारकार्डसह १७ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ बिरप्पा सिध्दप्पा करमल यांनी मधुकर सखाराम येवले (रा. मुलुंड कॉलनी, मुंबई) आणि त्याच्या अज्ञात साथीदाराविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८ (४), ३३६ (२), ३३६ (३), ३४० (२), ३ (५) आणि महाराष्ट्र जुगार कायदा ४, ५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post