मराठा आंदोलक जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात...

 मराठा आंदोलक जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात...


| बीड | दि.०४ ऑगस्ट २०२५ | मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे रविवारी बीड येथे एका हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी गेले असता त्या ठिकणी असेलेली लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट ग्राऊंडवर आदळली. हा प्रकार होताच गोंधळ उडाला.

जेव्हा हा अपघात झाला तेव्हा मराठा हृदययोध्दा मनोज जरांगे पाटील हे आपल्या काही सहकार्यांसोबत या लिफ्टमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी निघाले होते. लिफ्ट पहिल्या मजल्यावरुन खाली आदळल्यानंतर लिफ्टचा दरवाजा तोडून मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांना बाहेर काढण्यात आलं.

या लिफ्ट अपघातामध्ये सुदैवानं कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. या अपघातामध्ये लिफ्टमधील सर्वजण सुरक्षित आहेत. मात्र जरांगे पाटील यांच्या एका सहकार्‍याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. 

👉एका क्लिकवर वाचा आपला विजयमार्ग 

 

Post a Comment

Previous Post Next Post