२५० पेक्षा अधिक लोकसंख्येची गावे पक्क्या रस्त्याने जोडा
खासदार नीलेश लंके यांचे शिवराज सिंह चौहान यांना साकडे
| अहिल्यानगर |दि.01 एप्रिल 2025 | अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील अडीचशेहून अधिक लोकसंख्या असलेली गावे तसेच वाडयांना पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून पक्क्या रस्त्याने जोडण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे मंगळवारी केली.
यासंदर्भात खा. नीलेश लंके यांनी मंगळवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात नमुद करण्यात आले आहे की, अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात २५० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सामान्य गावांची संख्या अधिक आहे. ही गावे आतापर्यंत पक्क्या रस्त्याने जोडली गेलेली नाहीत. या सर्व गावांना पक्क्याने रस्त्यांच्या माध्यमातून मुख्य गावांना जोडणे गरजेचे आहे. ज्यायोगे त्या भागांतील रहिवाशांना सुलभ दळणवळणाचा लाभ घेता येईल असे खा. लंके यांनी या निवेदनात नमुद केले आहे.
खा. लंके यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या चौथ्या टप्प्याची केंद्र सरकारकडून सन २०२४ मध्ये घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये आदिवासी क्षेत्रातील २५० हून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना पक्क्या रस्त्याने जोडण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने २५० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना पक्क्या रस्त्यांनी जोडण्यासंदर्भात मंजुरी देणे आवष्यक आहे.या मागणीवर लवकरात लवकर निर्णय घेउन या गावांची वाहतूक सुलभ करण्याची मागणी खा. लंके यांनी निवेदनात केली आहे. मंत्री चौहान यांच्या भेटीप्रसंगी खा. सुप्रिया सुळे यांच्यासह बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे देखील उपस्थित होते.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग