। अहिल्यानगर । दि.27 जून 2025 । येथील रोहित रमेश मिस्किन यांना बोस्टन (अमेरिका) येथील ग्लोबल युनिर्व्हसिटीने पीएच. डी. प्रदान केली आहे. श्री. मिस्किन बांधकाम व्यावसायिक आहेत.
त्यांनी बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज इन इनोव्हेटिव्ह फायनान्सिंग ॲण्ड कॉस्टिंग दॅट सपोर्ट सस्टेनेबल रियल इस्टेट डेव्हलपमेंट इन इमर्जिंग सिटीज या विषयावर अत्यंत अल्प कालावधीत आपला प्रबंध सादर करून विशेष प्राविण्य मिळविले.
नवी दिल्ली येथील छोटेखानी कार्यक्रमात श्री. मिस्किन यांनी पीएच. डी. प्रदान करण्यात आली. श्री. मिस्किन यांनी पीएच. डी. मिळविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
Tags:
Ahmednagar