दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांकरिता नवीन वाहन क्रमांक मालिका सुरू

। अहिल्यानगर । दि.13 जुन 2025 ।  दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांकरिता नवीन वाहन क्रमांक मालिका सुरू करण्यात येत असून इच्छुक अर्जदारांनी १६ व १७ जून २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहित शुल्काच्या धनादेशासह अर्ज रोखपाल विभागाच्या खिडकी क्रमांक १४ वर जमा करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, अहिल्यानगर यांनी केले आहे.

👉क्लीक करुन बातमी वाचा...

अर्ज सादर करताना वाहन मालकाच्या नावाचा अर्ज असावा. अर्जासोबत पत्त्याचा पुरावा, पॅनकार्ड, आधारकार्ड व त्यास संलग्न भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांकाचा धनादेश 'अहिल्यानगर कँप शाखा / ट्रेझरी शाखा (कोड क्र. १३२९६)' यांच्यासाठी देय असावा.

👉 क्लीक करुन बातमी वाचा...

एका पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज प्राप्त झाल्यास त्याचा विचार केला जाईल. परंतु, एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास अशा अर्जांची यादी १७ जून २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल.

ज्या पसंती क्रमांकासाठी एकाहून अधिक अर्ज आलेले असतील, त्यांच्यासाठी अर्जदारांनी १८ जून २०२५ रोजी दुपारी १.३० वाजेपर्यंत पसंती क्रमांक शुल्काच्या धनादेशाव्यतिरिक्त जादा रकमेचा धनादेश बंद लिफाफ्यात सिलबंद स्वरूपात खिडकी क्रमांक १४ वर सादर करावा. त्यानंतर हे अर्जदार १८ जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात उपस्थित राहावेत.

👉 क्लीक करुन बातमी वाचा... 

लिलावासाठी अर्जदार किंवा त्यांचा प्रतिनिधी ओळखपत्र व प्राधिकारपत्रासह उपस्थित राहणे आवश्यक आहे. ज्या अर्जदाराने सर्वाधिक रकमेचा धनादेश सादर केला असेल, त्याला संबंधित पसंती क्रमांक देण्यात येईल. उर्वरित अर्जदारांचे धनादेश त्यांना परत करण्यात येतील.

विहित वेळेत अनुपस्थित राहिलेल्या अर्जदारांचा कोणताही विचार केला जाणार नाही. तसेच पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दूरध्वनी, भ्रमणध्वनी किंवा संदेशाद्वारे (एसएमएस) संपर्क केला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

👉 क्लीक करुन बातमी वाचा...



Post a Comment

Previous Post Next Post