| अहिल्यानगर |दि.01 एप्रिल 2025 | भर दिवसा घरफोडी करणारे 2 आरोपी पुणे येथून जेरबंद करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या कारवाईत 86,400 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई तुषार धाकराव व पोलीस अंमलदार संदीप पवार, संतोष लोढे, गणेश लोंढे, फुरकान शेख, अमृत आढाव, प्रशांत राठोड, सारीका दरेकर व महादेव भांड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
राजकुमारी आयोध्या शर्मा (रा.साईआनंद अपार्टमेंट, बुरूडगाव रोड) यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरातील सोने-चांदीचे दागिने, दोन मोबाईल व रोख रक्कम घरफोडी चोरी करून चोरून नेले होते.सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदरचा गुन्हा रवि रामकुमार सोलंकी (रा.खुर्जा बुलंद शहर, ता.खुर्जा, उत्तरप्रदेश) याने साथीदारासह केला असून
ते वडगाव बुद्रुक (जि.पुणे) येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे संशयीत आरोपींचा शोध घेऊन रवि रामकुमार सोलंकी (वय 25, रा.खुर्जा बुलंद शहर, ता.खुर्जा, उत्तरप्रदेश), दुष्यंतकुमार धिरेसकुमार यादव (वय 23, रा.बरसामई, ता.सिकंदराराव, जि.हाथरस, उत्तरप्रदेश) यांना ताब्यात घेतले.