सरपंच पुत्राला 25 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

। अहिल्यानगर । दि.03 एप्रिल 2025। नगर तालुक्यातील वाळुंज येथील सरपंच पुत्राला लाच स्वीकारताना लाचलुचपतच्या प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मकरंद गोरखनाथ हिंगे (वय 40,  रा.वाळुंज, ता. नगर) असे त्याचे नाव आहे. या संदर्भात बांधकाम ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती.

तक्रारदार ठेकेदारीचा व्यवसाय करतात. त्यांनी वाळुंज ग्रामपंचायतच्या हद्दीत पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम पूर्ण केले. सदरच्या कामाचे बिल देखील मंजूर झाले. मात्र त्यासाठी कामाच्या पूर्णत्वाचा दाखला वाळुंज ग्रामपंचायतचे सरपंच यांच्याकडून तक्रारदार यांना हवा होता. दाखला देण्याच्या मोबदल्यात सरपंच यांचा मुलगा मकरंद हिंगे याने सरपंचांची सही घेऊन देण्याकरीता 1 लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

तडजोडी अंती 45 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क साधुन तक्रार केली.त्यानुसार अधिकार्यांनी शहरातील बुरुडगाव रोड, अहिंसा चौक येथे सापळा लावला. त्यावेळी लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता 25 हजार रुपये स्वीकारताना मकरंद हिंगे याला रंगेहाथ पकडण्यात आले. 

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपाधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या अधिपत्याखाली पोलिस निरीक्षक छाया देवरे यांच्या पथकातील पोलीस नाईक उमेश मोरे, महिला पोलीस हवालदार राधा खेमनर, पोकॉ सचिन सुद्रुक, दशरथ लाड यांनी केली.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

👉 विजयमार्ग सबक्राईब करा....  

Post a Comment

Previous Post Next Post