सहकार चळवळीत उत्कृष्ट काम करणार्‍या संस्थांना पुरस्कार : जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे

 सहकार चळवळीत उत्कृष्ट काम करणार्‍या संस्थांना पुरस्कार : जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे


। अहिल्यानगर ।दि.28 जून 2025 । अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार चळवळीच्या विकासात उत्कृष्ट कामकाज करणार्‍या सहकारी संस्थांना महाराष्ट्र शासनामार्फत दि. 20 एप्रिल 2012 व 11 ऑक्टोबर 2013 रोजीच्या शासन निर्णयास अनुसरून सहकार पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार असून सन 2023-2024 या आर्थिक वर्षातील सहकारी संस्थांच्या कामगिरीच्या आधारावर सहकारी संस्थांची पुरस्कारासाठी निवड करण्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असल्याची माहिती आहिल्यानगरचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली.

सदर पुरस्काराकरिता दि.18 जुलै 2025 अखेर पर्यंत पात्र असणार्‍या सहकारी संस्थांनी त्यांचे प्रस्ताव उपनिबंधक, सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालय मार्फत सादर करण्याचे आव्हान सुरवसे यांनी केलेले आहे.

शासन निर्णयात नमूद केल्यानुसार महाराष्ट्र राज्यातून प्रथम पुरस्कार सहकार महर्षी हा एका संस्थेस  देण्यात येणार असून पुरस्काराचे स्वरूप रुपये एक लाख रकमेचा धनादेश,स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार सहकार भूषण हा एकवीस संस्थांना देण्यात येणार असून पुरस्काराचे स्वरूप रुपये एक्कावन्न हजार रकमेचा धनादेश,स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्रक. तृतीय  पुरस्कार सहकार निष्ठ हा तेवीस  संस्थांना देण्यात येणार असून पुरस्काराचे स्वरूप रुपये पंचवीस हजार रकमेचा धनादेश ,स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्रक. अशा एकूण 45 सहकारी संस्थांना देण्यात येणार आहे. 


या पुरस्कारासाठी पात्र ठरण्याकरिता संस्था प्रकार निहाय संस्थेची नोंदणी,वार्षिक सर्वसाधारण सभा, संचालक मंडळ सभा, नफा तोटा, थकबाकी, संस्थेवरील कायदेशीर कारवाई, लेखापरीक्षण, लेखापरीक्षण दोषदुरुस्ती अहवाल, निवडणूक, व्यवस्थापन, निधीची गुंतवणूक,प्रशिक्षण  व सादर करावयाचे प्रतिज्ञापत्रे इत्यादी साठी 50 गुण, संस्था प्रकारनिहाय निश्चित केलेल्या विशिष्ट निकषांसाठी 35 गुण  व सहकारी संस्थेसाठी योगदान, जनतेसाठी दिलेले योगदान, सहकार चळवळीच्या विकासासाठी केलेले प्रयत्न, सहकार, सार्वजनिक व धर्मदाय प्रयोजनसाठी केलेली मदत या साठी 15  गुण देण्यात येणार आहे अशी माहिती सुरवसे यांनी दिली.

पुरस्कार प्राप्त होणाऱ्या संस्थांची अंतिम निवड हि शासन स्तरावरील समिती मार्फत दिनांक २६/०९/२०२५ अखेर पर्यंत करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार विषयी अधिक माहिती सहकार विभागाच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर आणि जिल्हा उपनिबंधक आहिल्यानगर, तालुका उपनिबंधक, सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.

👉 क्लिक करुन वाचा...  

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कायद्याअंतर्गत नोंदणी झालेल्या इच्छुक आहिल्यानगर जिल्यातील सहकारी संस्थांनी शासन निर्णयात नमूद बाबींच्या अनुषंगाने विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक १८/०७/२०२५ अखेर पर्यंत दाखल करण्याचे जाहीर आव्हान श्री. मंगेश सुरवसे यांनी सहकार विभागामार्फत केलेले आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post