| छत्रपती संभाजीनगर | दि.31 मार्च 2025 | मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ.विजयकुमार घोगरे हे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा मराठा सेवा संघाच्या व समविचारी संघटनेच्या वतीने गौरव समारंभ, रुक्मिणी सभागृह एमजीएम विद्यापीठ परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे ३१ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.पुरुषोत्तम खेडेकर होते.
त्यांनी आपले अध्यक्षीय भाषणात डॉ.विजयकुमार घोगरे यांनी प्रशासकीय, सामाजिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी विजय संपादन केलेला आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी. आणि सर्वांशी प्रेमाचे संबंध घोगरे साहेबांनी प्रस्थापित केले आहेत. त्यांचा आदर्श घेऊन इतर अधिकाऱ्यांनी कार्य केलं पाहिजे. तर डॉ. विजयकुमार घोगरे यांनी सत्काराला उत्तर देताना मराठा सेवा संघ व सर्व समविचारी संघटना विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
आपल्या संपूर्ण कार्यकाळात आलेले अनुभव त्यांनी यावेळी विशद केले. आणि म्हणाले की तुमच्या सहकार्यामुळे आणि पाठिंबामुळेच मी हे सर्व कार्य करू शकलो. असं सहकार्य यापुढेही अपेक्षित आहे. अशी त्यांनी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. विजयकुमार घोगरे यांच्यावर काढलेल्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर डॉ.विजयकुमार घोगरे यांच्या कार्याविषयी डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली.
यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम जलसंपदा विभागाचे माजी सचिव व्यंकटराव गायकवाड, पुनम घोगरे, वर्षा घोगरे, हेमंत धुमाळ, दिलीप देशपांडे, सुनील मोहिते, उद्धव मराठे, मराठा सेवा संघाचे संस्थापक सचिव निर्मलकुमार देशमुख, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, गंगाधर बनबरे, वंदनाताई घोगरे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तर शाहीर समाधान इंगळे व अमरजीत बाहिती यांनी पोवाडा सादर केला.
याप्रसंगी विजयकुमार घोगरे साहेबांचे सहकारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे, सौरभ खेडेकर, जिजाऊ ब्रिगेडच्या सीमाताई बोके, डी. एस. काटे डॉ.शिवानंद भानुसे, धनंजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर शिखरे यांनी केले. तर वैशाली कडू व संजय सराटे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग