घातपात करण्याच्या उद्देशाने तलवार घेऊन फिरणारा युवक ताब्यात

| अहिल्यानगर | दि.31 मार्च 2025 | घातपात करण्याच्या उद्देशाने तलवार घेऊन फिरणार्‍या युवकास तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. दि. 30 रोजी रात्री 10 वाजता ही कारवाई करण्यात आली.

कृष्ठधाम रोड ते सोनानगर चौकाकडे जाणार्‍या रोडवर एक राखाडी रंगाचा टी शर्ट घातलेला इसम हातात एका पांढर्‍या रंगाच्या गोणीमध्ये तलवारी सारखे हत्यार घेवून फिरत आहे, अशी माहिती मिळाली. 

गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी   सदर ठिकाणी जावून सापळा लावला. एका इसमास ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव अक्षय अशोक टकले (वय 30,रा. निर्मलनगर, गाडेकर चौक) असे सांगितले, त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 1 हजार रूपये किंमतीची धारदार पाते असलेली तलवार मिळुन आली.

त्याच्याविरुध्द तोफखाना पोलिस ठाण्यात आर्म ऍक्ट कायदा कलम 4/25 प्रमाणे तसेच म.पो. अधि. कलम 37 (1), (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ भानुदास खेडकर हे करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पो.हे.कॉ योगेश चव्हाण, सुनील चव्हाण, अहमद इनामदार, वसिमखान पठाण, भानुदास खेडकर, सुमित गवळी, सतिष त्रिभुवन, सुजय हिवाळे, सतिष भवर, महेश पाखरे यांनी केली आहे.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

👉 विजयमार्ग सबक्राईब करा.... 

Post a Comment

Previous Post Next Post