बाजर समिती भुसार, फळे, भाजीपाला बाजार दि.३ व ४ जुलै रोजी बंद

| अहमदनगर | दि. ०2 जुलै २०२४ | बाजार समितीचे भुसार, फळे भाजीपाला बाजार दोन दिवस बंदबाबत राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे यांनी दिली आहे.

कृषि उत्पन्न बाजार समिती, अहमदनगरचे यार्डवर सालाबादप्रमाणे श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा, श्री क्षेत्र त्रंबकेश्वरवरुन श्री क्षेत्र पंढरपुर पायी दिंडी सोहळा मंगळवार दि ०२ जुलै २०२४ व बुधवार दिनांक ०३ जुलै २०२४ या दोन दिवसांकरीता मुक्कामासाठी येणार आहे.

💥 अर्थसंकल्पातून सामाजिक उत्कर्षाचा प्रयत्न : ना.विखे

दि. ०४ जुलै २०२४ रोजी प्रस्थान करणार आहे. सदरची दिंडी समितीचे भुसार व भाजीपाला यार्डवर दोन दिवस मुक्कामी असून दिंडीमध्ये सुमारे ५०,००० वारकरी सहभागी आहेत. त्या अनुषंगाने बुधवार दिनांक ०३ जुलै २०२४ व गुरुवार दि. ०४ जुलै २०२४ या दोन दिवसांकरीता समितीच्या मुख्य बाजाराचे भुसार व भाजीपाला बाजार बंद राहणार  आहे.

💥 संत निवृत्तीनाथ महाराज पालखीची मोठी परंपरा : माजी आ. सुधीर तांबे

तर शुक्रवार दि.०५ जुलै २०२४ रोजीपासून बाजार नियमित चालु राहील. त्यामुळे भुसार, फळे भाजीपाला उत्पादक सर्व शेतकरी बांधवानी सदरचे बंद कालावधीमध्ये आपला शेतमाल यार्डवर विक्रीस आणू नये असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समिती अहमदनगरचे सभापती  भाऊसाहेब बोठे यांनी केले आहे. 

यावेळी सचिव अभय भिसे, सहा. सचिव बाळासाहेब लबडे, सहा. सचिव सचिन सातपुते, सहा. सचिव संजय काळे आदिंसह समितीचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

💥 जिल्हा परिषदेच्या घंटागाडी खरेदीत भ्रष्टाचार! 

Post a Comment

Previous Post Next Post