संत निवृत्तीनाथ महाराज पालखीची मोठी परंपरा : माजी आ. सुधीर तांबे

संत निवृत्तीनाथ महाराज पालखीची मोठी परंपरा : माजी आ. सुधीर तांबे

अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करताना रिमझिम पावसात दिंडीचे अभूतपूर्व स्वागत

संगमनेर |  दि.28 जुन 2024 | शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे अहमदनगर जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी रिमझिम पाऊस व अत्यंत भक्तीमय वातावरणात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी या पालखीचे स्वागत व पूजन केले. पारेगाव बु. येथे पंढरपूरसाठी निघालेल्या या पालखीचे सुमारे विस हजार वारकऱ्यांसमवेत आगमन झाले. यावेळी माजी आ. डॉ. तांबे यांनी पालखीचे पूजन केले.

याप्रसंगी समवेत अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक देविदास ढूमने, डॉ. दत्तात्रय गडाख, त्र्यंबकराव गडाख, साहेबराव गडाख, सोपानराव येलके, दौलत गडाख, ज्ञानेश्वर मुंगसे, आदींसह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

रिमझिम पावसात सुमारे वीस हजार वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने या वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावर विविध अभंग गात अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केला. लेझीम पथक, पारंपारिक वाद्य व वेशभूषा करून गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी या पालखीचे स्वागत केले.

डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, संत निवृत्तीनाथ महाराज पालखीला मोठी परंपरा आहे दरवर्षी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात ही अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करताना या पालखीचे स्वागत करतात. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदाय हा हजारो वर्षांपूर्वीच असून सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. जात-पात धर्म हा कोणताही भेदभाव या संप्रदायात नाही.

Post a Comment

Previous Post Next Post