। अहमदनगर । दि.03 जुन 2024 । खडी क्रेशर काम करणाऱ्या परजिल्ह्यातील कामगाराने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील वारूळवाडी येथे घडली आहे. संतोष गंगाराम पंडित (वय ३५, मूळ रा. ब्राम्हणवाडा, हिंगोली, हल्ली रा. शेंडी- पोखर्डी, ता.नगर) असे मयताचे नाव आहे.
पुणे पोर्शे कार अपघातात आरोपीच्या आईला अटक
मयत संतोष पंडित हा गेल्या काही दिवसांपासून वारूळवाडी शिवारात असलेल्या खडी क्रेशर काम करत होता. कामावर आल्यावर त्याने खडी क्रेशर वरच गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यावर त्याचा भाऊ दादाराम मुकुंदा पंडित याने त्यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. खेडकर यांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले.
टिळक रोडवरील मटका जुगार अड्ड्यावर छापा
या प्रकरणी भिंगार कम्प पोलिस ठाण्यात सी आर पी सी 174 प्रमाणे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलिस हवालदार विधाते करीत आहेत.
Tags:
Crime
