टिळक रोडवरील मटका जुगार अड्ड्यावर छापा


। अहमदनगर । दि.30 मे 2024 ।  विनापरवाना बेकायदेशीररित्या लोकांकडून पैसे घेऊन कागदाच्या चिठ्ठयावर आकडे लिहून कल्याण मटका जुगार अड्डा चालवणाऱ्या जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 730 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई टिळक रोडवरील सिमेंट दुकानाच्या आडोशाला असलेल्या अड्ड्यावर केली.

👉 धावत्या पिकअप मधून पडून युवकाचा मृत्यू 

कोतवाली पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता तेथे एक इसम बसलेला व त्याचे समोर दोन तीन इसम ऊभे असलेले दिसले. व बसलेला इसम त्याच्या हातातील पुस्तकावर काहीतरी आकडे लिहिताना दिसल्याने पोलीसांनी अचानकपणे त्या ठिकाणी छापा टाकला असता उभे असलेले इसम पोलिसाना पाहताच पळून गेले.

👉   सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळल्या

तेथें बसलेल्या इसमास जागीच पकडून त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव कांतिलाल शरद सितापूरे (वय 43 रा. सुडके मळा, बालिकाश्रम रोड, अहमदनगर ) असे सांगीतले. पोलीसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे 730 रुपये, रोख रक्कम, कल्याण मटका जुगाराचे साहित्य असा एकुण 730 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्यास ताब्यात घेतले.

👉 युवकाला लिफ्ट मागण्याच्या नावाखाली लुटले  

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात कांतिलाल सितापुरे यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद केली. पुढील कारवाई पोलीस करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post