। लोणी । दि.29 मे 2024 । महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निक येथे केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले असल्याची माहीती प्राचार्य प्रा. डॉ. विजयकुमार राठी यांनी दिली.
१० वी आणि १२ वीच्या परिक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. डिप्लोमा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश नोंदणी अर्ज स्विकारले जात आहेत. प्रथम वर्ष प्रवेश नोंदणी दिनांक २९ मे ते २५ जून २०२४ पर्यंत ऑनलाईन प्रवेश नोंदणीसाठी मुदत आहे.
लोणी येथील प्रवेश मार्गदर्शन केंद्रामध्ये तज्ञ मार्गदर्शक उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना प्रवेशासंबंधीची सविस्तर माहिती, नियम, ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरणे, पसंती क्रमांक देणे सहजसुलभ होणार आहे. प्रवेश सुविधा केंद्रासाठी स्वतंत्र अद्ययावत प्रवेश व मार्गदर्शन कक्ष स्थापन केला आहे. विद्यार्थ्यांनी माहितीसाठी प्राचार्य डॉ. विजयकुमार राठी ७७२२०९१२७७ आणि प्रा. वसिम तांबोळी ९०४९०८४७८६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
Tags:
Ahmednagar
