। अहमदनगर । 19 मे 2024 । शिवसेना युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीचे निवेदन महाविकास आघाडीच्यावतीने जिल्हा पोलिस उपधिक्षक अमोल भारती यांना देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, गिरीष जाधव, दिलदारसिंग बीर, प्रमोद वारुळे आदि उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी १३ मे रोजी विक्रम राठोड यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा. मतदानाच्या दिवशी महायुतीचे उमेदवाराकडून काही मतदारांना बोटाला शाई लावून पैसे देण्याचा प्रकार सुरु होता. तो महाविकास आघाडीच्यावतीने उधळून लावण्यात आला. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेजची सर्व तपासणी करुन याची सखोल चौकशी करण्यात यावी व खोटा दाखल गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे म्हटले आहे.
यावेळी संभाजी कदम म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना वेगवेगळे आमिष देण्यात येत होते, काही ठिकाणी पैसे वाटण्याचेही प्रकार झाले. याबाबत महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी यास प्रतिबंध केला. त्यामुळे याचा राग मनात धरुन असे खोटे गुन्हे पदाधिकार्यांवर दाखल केले आहेत. संपूर्ण घटनांचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी तपासून, सत्य समोर आणावे, अशी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
👉 पर्यटकांनी काजव्यांचा शांततेत आनंद लुटावा
👉 आर्थिक पत्रके जाहीर करणारी समता महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था : काका कोयटे
