ताहाराबाद येथील तरुणाची विषारी औषधाने आत्महत्या



। अहमदनगर
। ता. राहुरी । 21 मे 2024 । राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील नितीन नानासाहेब विधाटे (वय २४) या विवाहित तरुणाने दि. १९ मे २०२४ रोजी रात्रीच्या दरम्यान त्याच्या राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे. मृत तरुणाचा मृतदेह काल सकाळी त्याचा घरात आढळून आला.

राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील २४ वर्षीय तरुण नितीन विधाटे या तरुणाने दि. १९ मे २०२४ रोजी रात्रीच्या दरम्यान आपल्या राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

नितिन याचे वडिल नानासाहेब व चुलते गंगाधर विधाटे व नातेवाईकांनी मयत तरूणाची पत्नी व त्याचे सासू-सासरे व नातेवाईकांवर आरोप केले आहे की, नितीनला सासरच्या लोकांकडून कायम त्रास दिला जात होता. त्यामुळे त्याने या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक रामनाथ सानप यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन राहुरी येथे शवविच्छेदन केले.

नितीनच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई, वडील, सहा बहिणी असा मोठा परिवार आहे. नितिन हा मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. नितीन याला सहा बहिणी असून सहा बहिणींना एकुलता एक भाऊ होता. नितीन याने नेमके कोणत्या करणातून आत्महत्या केली, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात आकस्मात गून्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

👉 विक्रम राठोड यांच्यावर दाखल खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा 

👉 पर्यटकांनी काजव्यांचा शांततेत आनंद लुटावा

👉  शेतकऱ्यांनो, बियाणे खरेदी करताना दक्षता घ्या : कोहकडे

Post a Comment

Previous Post Next Post