नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ


। 
अमरावती । दि.31 मे 2024 । मरियमपूर गाव व परिसरातील ग्रामस्थांना या कडाक्याच्या उन्हात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. येथील लोक जीव धोक्यात घालत आहेत. कच्चा रस्ता आणि उंच डोंगरावरून लोकांना पाणी आणावे लागत आहे. या भागातील पाण्याचा एकमेव स्त्रोत म्हणजे प्रदूषित तलाव. त्याच पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागते आहे. प्रदूषित तलावाच्या बाजूने खड्डे पडले आहेत.

👉 टिळक रोडवरील मटका जुगार अड्ड्यावर छापा

दूषित पाण्यामुळे लोक आजारी पडत आहेत, तरीही गावकरी हेच पाणी आणत आहेत. ते वापरणे अधिक धोकादायक आहे. दूषित आणि अस्वच्छ पाण्यामुळे लोक आजारी पडत आहेत. हे घाण पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांना मैलो न मैल पायपीट करावी लागत आहेत. मरियमपूर गावातील रहिवासी फुलकाई बेलसरे सांगतात, की खड्ड्यातील पाणी संपले की, तलावातून घाण पाणी न्यावे लागते. आम्ही रात्री 10-11 वाजेपर्यंत पाणी आणण्यासाठी बसून राहतो. खड्ड्यतील पाणी संपले तर घाण पाणी तलावातून घ्यावे लागते. आम्हाला ना पाण्याचे टँकर मिळत आहेत ना नळाला पाणी मिळत आहे.

👉 धावत्या पिकअप मधून पडून युवकाचा मृत्यू

मरियमपूर गावात राहणारे सुभाष सावळकर म्हणाले, की पहाटे चार वाजता उठून तलावाजवळ यावे लागते. पाणी गोळा करण्यासाठी खड्डा खणावा लागतो. हे पाणी पिऊन आमची मुले आजारी पडत आहेत, इथे पाण्याचा दुसरा स्रोत नाही. पाण्याचा टँकरही येत नाही. जस्मिन प्रकाश म्हणाल्या, की येथील परिस्थितीचा कोणीही आढावा घेत नाही. हे पाणी पिऊन लोक आजारी पडत आहेत. आमच्या समस्येकडे ना पाणीपुरवठा विभागाचे लक्ष आहे ना नगरपालिकेचे. प्रत्येक गावात पाण्याची टाकी आणि विंधनविहीर आहे; पण आमच्या गावात पाण्याअभावी विंधनविहीर खोदता येत नाही. 

👉 सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळल्या 

Post a Comment

Previous Post Next Post