गुरुंचे मार्गदर्शनासह कष्टाशिवाय जीवनात परिवर्तन नाही
सिताराम खिलारी; ढोकेश्वर विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 98.64 टक्के
। पारनेर। दि.30 मे 2024 । विद्यालयाने वर्षभर केलेले उत्कृष्ट नियोजन, शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन आणि विद्यार्थी मित्रांनी केलेले कष्ट याशिवाय विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन होणे शक्य नाही, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी यांनी केले.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित पारनेर तालुक्यातील श्री ढोकेश्वर माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाचा इयत्ता दहावी निकाल 98.64 टक्के लागला आहे. इयत्ता दहावीला एकूण 148 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी 146 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांपैकी 11 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. विशेष योग्यता श्रेणी मध्ये 66 विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये 53 विद्यार्थी, तृतीय श्रेणीमध्ये 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्यावतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता.
त्याप्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी पाटील बोलत होते. यावेळी पत्रकार शरद झावरे, संतोष कोरडे, शंकर शेळके, डॉ. अरुण झावरे, बाळासाहेब ठाणगे, बापूसाहेब रांधवन, संतोष मंचरे, अनिल ठाणगे, मल्हारी वाघसकर, अनिता म्हस्के, सोमनाथ होराणे, अनुष्का कांबळे उपस्थित होते.
झावरे अपूर्वा शरद 94.8 टक्के, झावरे आदेश अरुण 93.4 टक्के, रोकडे श्रद्धा अशोक 93 टक्के, ठाणगे वेदिका अनिल 92.8 टक्के, सुतार गौरव ज्ञानेश्वर 92.4 टक्के हे विद्यालयात प्रथम आलेले पाच विद्यार्थी आहेत.
या सर्व यशस्वी विदयार्थ्यांना प्राचार्य सुनिल वाव्हळ, पर्यवेक्षक शिवाजी सावंत, बाळासाहेब निवडुंगे, राहुल झावरे, अमोल ठाणगे, बाबासाहेब जाधव, रवींद्र मते, सोनल रोहकले, वर्षा भोंडवे इत्यादी शिक्षकांनी वर्षभर मार्गदर्शन केले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव ॲड. विश्वासराव आठरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सहसचिव जयंतराव वाघ, खजिनदार ॲड. दिपलक्ष्मी म्हसे, नंदकुमार झावरे पाटील, सिताराम खिलारी, डॉ. भाऊसाहेब खिलारी, प्राचार्य सुनिल वाव्हळ, शिवाजी सावंत यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
