। अहमदनगर । दि.31 मे 2024 । इंडियन पॉवरलिरफ्टिग फेडनेशनच्या मान्यतेने अॅमेचर पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या (महाराष्ट्र) वतीने चेंबुर (मुंबई) येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग अॅण्ड बेंचप्रेस चॅम्पियनशीप स्पर्धेत नगरच्या अनुराधा मिश्रा स्पर्धेत नगरच्या अनुराधा मिश्रा यांनी विविध प्रकारात तीन सुवर्ण पदक पटकाविले तर त्यांची दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत विविध राज्यातून मोठ्या संख्येने महिला व पुरुष खेळाडू सहभागी झाले होते.
स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी पॉवरलिफ्टिंग मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले. मिश्रा यांनी 63 किलो वजन गटात बेंच प्रेस, स्कॉट्स व डेडलिफ्ट मध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. तर एक कास्य पदकासह त्यांनी चषक पटकाविले. त्यांना मेडल व चषकाने सन्मानित व चषकाने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांची महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यात होणार्या पॉवरलिफ्टिग स्पर्धेसाठी पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मिश्रा या सावेडी येथील जिम स्ट्राईकर मध्ये प्रशिक्षक स्वप्निल मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
👉 टिळक रोडवरील मटका जुगार अड्ड्यावर छापा
👉 सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळल्या
👉 युवकाला लिफ्ट मागण्याच्या नावाखाली लुटले
Tags:
Maharashtra
