ना.नारायण राणे यांना मराठा तरुणांनी दाखवले काळे झेंडे!

 

। अहमदनगर  । दि.08 मार्च 2024 ।  मराठा आरक्षणासाठी लढणारे संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे नगर दौर्‍यावर असताना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी मुख्यालय मैदान येथून 8 रोजी ताब्यात घेतले आहे.

ना.राणे हे शुक्रवारी नगर तालुक्यातील अकोळनेर येथे एका उद्घाटन कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती मराठा आंदोलकांना मिळाली होती. राणे यांचे नगरच्या पोलिस मुख्यालयातील मैदानात आगमन होणार असल्याचे समल्यावर काही मराठा आंदोलक तेथे जमा झाले ते मंत्री राणे यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्याच्या तयारीत असताना पोलिसांना त्यांची माहिती मिळाली. 

मराठा आंदोलक युवकांनी काळे झेंडे फडकवले. एक मराठा लाख मराठा च्या घोषणांनी युवकांनी काळे झेंडे फडकवत नारायण राणे यांचा निषेध केला. त्यामुळे पोलिसांनी तातडीने हालचाली करत त्यांना ताब्यात घेतले असल्याची पोलिसांकडून सांगण्यात आले. नेमके कोणाकोणाला ताब्यात घेतले याची माहिती उशिरापर्यंत समजू शकली नाही.

1 Comments

Previous Post Next Post