। अहमदनगर । दि.02 फेब्रुवारी 2024 । पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ व्या लोकसभेत नवीन प्रतिभा आणण्यासाठी शोध घेत आहेत. त्यासाठी किमान ५० टक्के विद्यमान खासदार बदलण्यास ते उत्सुक आहेत. निवृत्त अधिकाऱ्यांना उमेदवारी देण्याच्या मानसिकेत सध्या भाजप आहे. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातबदल करायचा झाल्यास निवृत्त अधिकाऱ्याला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निवृत्त अधिकारी कोण निवडणूक लढविण्यास इच्छूक आहे, याचीच सध्या जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.
भाऊसाहेब वाकचौरे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर राजकारणात सक्रीय झालेले आहे. पहिल्या वेळेस ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. आता सध्या लहू कानडे हे श्रीरामपूर मतदार संघातून निवडून आलेले आहेत.
आता अहमदनगर लोकसभा मतदार संघातून डाॅ. सुजय विखे यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यास त्यांच्या जागेवर कोण उभे राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तूर्त तरी या जागेवर माजी पालकमंत्री राम शिंदे निवडणूक लढणार अशीच चर्चा सुरु होती.
परंतु आता सेवानिवृतत् अधिकारी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे, अशी चर्चा सुरु झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वरिष्ठ पदावरून कोण-कोणते अधिकारी सेवानिवृत्त झालेले आहेत, याची माहिती भाजप कार्यकर्ते घेत आहेत.
सध्या जिल्ह्यात वेगवेळ्या अधिकाऱ्यांची नावे चर्चेत येत आहे. मात्र ठोस असे कोणतेच नाव पुढे आलेले नाही. परंतु जर विखे यांना उमेदवारी दिली नाही तर त्यांच्या जागी तेव्हढ्या तोडीचाच उमेदवार निवडणुकीत उतरावा, लागेल, अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे.
Tags:
Ahmednagar
