शिवसेनेचे गिरीष जाधव व संभाजी ब्रिगेडचे राजेश परकाळे शिर्डीत स्थानबध्द

 


। अहमदनगर  । दि.26 ऑक्टोबर 2023 । पंतप्रधान मोदी यांनी शिर्डीतील सभेत मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली नाही तर मराठा तरुण सभेत घुसून जाब विचारतील, असा इशारा देणारे संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव यांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबध्द केले आहे.

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे होत असलेल्या सभेमध्ये मराठा, धनगर व इतर तसम आरक्षणावर आपली भुमीका स्पष्ट करावी, असे आवाहन केले होते. 

या सभेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव अहमदनगर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांच्यासह गौरव ढोणे, बंटी भिंगारदिवे, अवि मेढे, अरुण रोडे पाटील, मयूर जेधे, भगवान कोकाने यांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतरही मराठा आंदोलक कार्यकर्त्याची धरपकड सुरु होती.

Post a Comment

Previous Post Next Post