रविकिरण भूतकर यांचे अल्प आजाराने निधन


। अहमदनगर । दि.01 ऑक्टोबर 2023 । नगर शहरातील भुतकरवाडी येथील रहिवाशी रविकिरण अशोक भूतकर (वय 37) यांचे रविवारी (दि.1 ऑक्टोबर 2023) सायंकाळी पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. रविकिरण यांची प्रकृती खालावल्याने शुक्रवारी (दि.29) त्यांना प्रथम नगरमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर त्यांना पुण्यास हलविण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना रविवारी (दि.1) सायंकाळी 4.45 च्या सुमारास त्यांचे निधन झाले. रात्री उशिरा नगरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रविकिरण भुतकर यांनी विविध समाजिक उपक्रमात भाग घेतला. येथील जिजाऊ प्रतिष्ठानचे ते सदस्य होते. विविध संस्थांना त्यांनी वेळोवेळी मदत केली. तसेच ते प्रॉपर्ट्री व्यावसायिक होते.

Post a Comment

Previous Post Next Post