। मुंबई । दि. 01 सप्टेंबर । जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून याप्रकरणातून दडपशाही करण्याचा शिंदे-फडणवीस यांचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
जालन्यात अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर अमानूष लाठीचार्ज केल्याचा निषेध नोंदवत भानुसे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी केली आहे.
Tags:
Maharashtra
