शेतकर्‍याला मारहाण करुन डाळींबांची चोरी करणारी टोळी जेरबंद

 

। अहमदनगर । दि.21 ऑगस्ट 2023 ।  अहमदनगर  नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील डाळींबाच्या बागेत घुसून शेतकर्‍यास मारहाण करुन डाळींबाची चोरी करणार्‍या 9 आरोपींची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. त्यानुसार साईनाथ बाबुराव आहिरे, नवनाथ सोमनाथ गवळी यांच्यासह अक्षय दिलीप आहेर (वय 22), लालु बाबुराव आहिरे (वय 30), वाल्मिक बबन आहिरे (वय 22, तिघे रा. चितळी, ता. पाथर्डी), नानासाहेब चांगदेव वर्डे (वय 30), प्रल्हाद शंकर पवार (वय 40), विठ्ठल सोपान बर्डे (वय 30, सर्व रा. कोरगांव, ता. नेवासा), व एक विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेतले. आकाश पोपट माळी फरार आहे.

अवतार मेहेरबाबा विद्यालयात रंगले तृणधान्य प्रदर्शन

याबाबत माहिती अशी, की बाबासाहेब सुधाकर मोटे (वय 51, रा. वडाळा बहिरोबा) यांच्या व त्यांच्या शेजारील शेतकर्‍याच्या शेतातील 3 लाख 40 हजार रुपये किंमतीचे परिपक्व 150 कॅरेट डाळींब आरोपींनी शेतकर्‍यास मारहाण करुन चोरुन नेले होते. याबाबत शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तपासात शेतकर्‍यास 7 ते 8 आरोपींनी मारहाण करुन डाळींबाची चोरी केल्याचे आढळले. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्ह्यास दरोड्याचे वाढीव कलम लावण्यात आले होते.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी : विखे पाटील

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, अतुल लोटके, पोना रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, ज्ञानेेशर शिंदे, फुरकान शेख, पोकों किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, मेघराज कोल्हे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, चापोहेकॉ अर्जुन बडे व अरुण मोरे यांचे पथक नेमले. पथक नेवासा परिसरात पेट्रोलिंग फिरून आरोपींची माहिती घेताना आहेर मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा
साईनाथ आहिरे (रा. कोरगांव, ता. नेवासा) व नवनाथ गवळी (रा. आंतरवली, ता. नेवासा) यांनी त्यांच्या साथीदारासह केल्याचे व ते कोरगांव येथे आले असल्याचे समजले.

जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेचे लोखंडी पाईप चोरणारी अंतराज्य टोळी जेरबंद

आहेर यांनी ही माहिती पथकास कळवून पंचाना सोबत घेत कारवाईचे आदेश दिले. पथकाने तेथे जात संशयितांच्या वास्तव्याबाबत माहिती घेतली. ते तेथे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सदरची कारवाई
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर   स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

जिल्हयात मतदार नाव नोंदणी अभियानास सुरुवात 

Post a Comment

Previous Post Next Post