अवतार मेहेरबाबा विद्यालयात रंगले तृणधान्य प्रदर्शन

अवतार मेहेरबाबा विद्यालयात रंगले तृणधान्य प्रदर्शन

नामशेष होणार्‍या तृणधान्याच्या प्रचार-प्रसारासाठी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाचा उपक्रम


। अहमदनगर । दि.19 ऑगस्ट ।  अरणगाव (ता. नगर) येथील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अवतार मेहेरबाबा विदयालयात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमि त्त नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या तृणधान्याचा प्रचारप्रसारासाठी तृणधान्याचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्याचबरोबर या प्रदर्शनात नवभारत साक्षरता अभियान, माझा देश माझी माती, सार्वजनिक स्वच्छता, पर्यावरण आदी विषयांवर आधारीत विद्यार्थ्यांनी तयार केलेले तक्ते, पोस्टर, पाककृती, रांगोळी यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.

या प्रदर्शनाचे उद्घाटन अवतार मेहेरबाबा पी.पी. सी. ट्रस्टचे विश्वस्त रमेश जंगले व मेहेर प्रसाद राजू यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अरणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख उदयकुमार सोनावळे, कृषि पर्यवेक्षक प्रतिमा राऊळ, कृषि सहाय्यक मंदा भारती, विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक झिने आदींसह सर्व शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्तविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक झिने यांनी शासकीय योजना व उपक्रम यांची चांगल्या रितीने अंमलबजावणी व्हावी व जनजागृती व्हावी.

उपक्रम कागदावर न राहता प्रत्यक्षात कृतीत उतरावा. हा प्रदर्शन भरवण्यामागचा हेतू असून तृणधान्य नामशेष होण्याच्या मार्गावर असून तृणधान्याचा प्रचार-प्रसार आहारात समावेश होणे गरजेचे असल्याचे सांगून, विद्यालयात अशाच प्रकारचे उपक्रम यापुढेही राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तृणधान्य व त्याच्या पौष्टीक घटकाविषयी कृषि पर्यवेक्षक प्रतिभा राऊळ व मंदा भारती यांनी माहिती दिली.

रमेश जंगले व मेहेर प्रसाद राजू यांनी प्रदर्शन पाहून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शाळेने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनावळे यांनी अवतार मेहेरबाबा विद्यालय ही उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी केंद्रातील पहिली शाळा आहे.

पुस्तकी ज्ञान प्रत्यक्षात अनुभवातून विद्यार्थ्यांना दिले जात असून, केंद्रातील इतर शाळांनी देखील या पध्दतीने उपक्रम राबविण्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल देवकर व सुरेखा गाडे यांनी केले. आभार रावसाहेब शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱी, पालक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post