जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील अत्याधुनिक सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचा शुभारंभ

। अहमदनगर । दि.15 ऑगस्ट 2023 । जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतुन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अशा सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचा राज्याचे महसुल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

हर घर तिरंगा रॅलीतून शहिदांचे स्मरण : खा.डॉ. सुजय विखे पाटील

यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील ७६ पोलिसांना स्वातंत्र्यदिनानिमित्त पदके जाहीर

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, अशा प्रकारची अत्याधुनिक यंत्रणा शहरामध्ये कार्यान्वित करण्याची शहरवासियांची मागणी होती ती आज या निमित्ताने पुर्ण होत आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील 51 चौकांमध्ये 204 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये आणखीन 200 कॅमेरे बसविण्यात येणार असुन जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका क्षेत्रामध्ये अशा प्रकारची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. 

भविष्यकाळ सुरक्षित करण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे.... 

या यंत्रणेमुळे शहरांतर्गत व शहराबाहेर होणाऱ्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यास मदत होऊन गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनाला यामुळे आळा घालता येणार आहे. गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगार पळुन जातात. अशावेळी या कॅमेऱ्यामुळे गुन्हेगारांच्या वाहनांचा क्रमांक तसेच त्यांचे चेहरे ओळखता येणे शक्य होणार आहे. 

चोरीला गेलेले सात महागडे मोबाईल तक्रारदारांना परत 

या यंत्रणेबरोबरच उद्घोषणा यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली असुन नियंत्रण कक्षातुन नागरिकांना सुचना देणेही यामुळे शक्य होणार असल्याचेही पालकमंत्री श्री विखे पाटील  यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मुंबई मॅरेथॉन सर्वसमावेशक स्पर्धा :राज्यपाल रमेश बैस 

Post a Comment

Previous Post Next Post