। अहमदनगर । दि.14 ऑगस्ट 2023 । कोतवाली पोलिसांनी चोरीला गेलेले आणि हरवलेले एक लाख 62 हजार रुपये किंमतीचे सात महागडे मोबाईल तक्रारदारांना परत केले. कोतवाली पोलिसांनी विशेष मोहीम राबवून सहा लाख रुपये किंमतीचे 39 मोबाईल तपास करून हस्तगत केले. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तक्रारदारांना पोलिस ठाण्यात बोलावून मोबाईल परत केले आहेत.
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’निमित्ताने राज्यात स्वातंत्र्यदिनी १८६ बंद्यांना विशेष माफी
शेख इरफान इब्राहिम (रा.तांबटकर गल्ली,अहमदनगर), एजाज शेख (राहणार मुकुंदनगर, अहमदनगर), किशोर पटेल (रा.टिळकरोड, अहमदनगर), युसुफ शेख (रा.भिवंडी,मुंबई), राजू वाघ (रा.अहमदनगर), शेख रहीम (रा.अहमदनगर) यांना मोबाईल परत मिळाले आहे. पोलिस पथकाने मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांचा तांत्रिक बाबींच्या आधारे सखोल तपास करून गेल्या तीन महिन्यात चोरीतील जवळपास सहा लाख रुपये किमतीचे 39 मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
मुंबई मॅरेथॉन सर्वसमावेशक स्पर्धा :राज्यपाल रमेश बैस
हरवलेला मोबाईल मिळाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहर्यावर पाहायला मिळत होता. मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी कोतवाली पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलिस नाईक सलीम शेख,राजेंद्र फसले तसेच दक्षिण मोबाईल सेलचे शिंदे यांनी ही कारवाई पार पाडली.
