। अहमदनगर । दि.24 ऑगस्ट 2023 । नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलावामधील अवैध पाणी उपसा बंद करण्याची मागणी शिवप्रहार संघटनेचे तालुकाप्रमुख गोरख आढाव यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,
की पिंपळगाव माळवी तलावामध्ये सध्या तीस टक्के पाणीसाठा शिल्लक असून सध्या पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. असे असतानाही सध्या तलावामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा चालू आहे.
हा उपसा अजून दोन महिने असाच राहिला पिंपळगाव माळवीसह सहा-सात गावांना दुष्काळाचा मोठा फटका बसणार आहे. या परिसरामध्ये पशुधन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई आत्ताच जाणवू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने सात दिवसांत कारवाई न केल्यास शिवप्रहार संघटनेच्यावतीने महानगरपालिकेसमोर बेमुदत आमरण उपोषणास बसण्याचा इशारा आढाव यांनी दिला आहे.
या निवेदनावर राहुल झिने, योगेश शिंदे, मनोज भोंदे, अभिमन्यू झिने, राजू रासकर, रामदास झिने, गणेश कदम, आदिनाथ झिने, सुशांत शिंदे, हरीष गायकवाड, एकथान झिने, सोमनाथ झिने, सागर गुंड यांच्या सह्या आहेत.
Tags:
Ahmednagar
